विशेष 30 गाड्यांना जुलैपर्यंत मुदतवाढीने प्रवाशांना दिलासा
भुसावळ विभागातील प्रवाशांची जागेची अडचण सुटण्यास मदत
भुसावळ : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने अप-डाऊन मार्गावर 30 गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. या गाड्यांचा कार्यकाळ जून-जुलैपर्यंत वाढवण्यात आला. त्याचा विभागातील प्रवाशांना लाभ होईल.
या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
त्यात अप हटिया-एलटीटी (प्रत्येक शुक्रवार) गाडीचा विस्तार 2 एप्रिल ते 25 जून, डाउन एलटीटी-हटिया (रविवार) 4 एप्रिल ते 27 जून, अप हावडा-एलटीटी (रविवार, गुरुवार) 4 एप्रिल ते 1 जुलै, डाउन एलटीटी – हावडा (शुक्रवार,मंगळवार) 2 एप्रिल ते 29 जून, अप भुवनेश्वर-एलटीटी (सोमवार, गुरुवार) 1 एप्रिल ते 28 जून, डाउन एलटीटी- भुवनेश्वर (बुधवार, शनिवार) 3 एप्रिल ते 30 जून, अप पुरी-एलटीटी (मंगळवार) 6 एप्रिल ते 29 जून, डाउन एलटीटी-पुरी (गुरुवार) 8 एप्रिल ते 1 जुलै, अप विशाखापट्टणम-एलटीटी (रविवार) 4 एप्रिल ते 27 जून, डाउन एलटीटी-विशाखापट्टणम (मंगळवार) 6 एप्रिल ते 29 जून, अप विशाखापट्टणम -गांधीधाम (गुरुवार) 1 एप्रिल ते 24 जून, डाउन गांधीधाम-विशाखापट्टणम (रविवार) 4 एप्रिल ते 27 जून, डाउन पुणे-संतरागाची (सोमवार) 5 एप्रिल ते 28 जून, अप संतरागाची-पुणे (शनिवार) 3 एप्रिल ते 28 जून, डाउन पुणे-दरभंगा (बुधवार) 7 एप्रिल ते 30 जून, अप दरभंगा-पुणे (शुक्रवार) 9 एप्रिल ते 2 जुलै, डाउन पुणे-लखनऊ (मंगळवार) 6 एप्रिल ते 29 जून, अप लखनऊ-पुणे (गुरुवार) 8 एप्रिल ते 1 जुलै, डाउन एलटीटी-लखनऊ (सोमवार, बुधवार, शनिवार) 3 एप्रिल ते 30 जून, अप लखनऊ-एलटीटी (मंगळवार, गुरुवार, रविवार) 4 एप्रिल ते 1 जून, डाउन एलटीटी-गोरखपूर (गुरूवार, सोमवार) 1 एप्रिल ते 28 जून, अप गोरखपूर- एलटीटी (शुक्रवार, मंगळवार) 2 एप्रिल ते 29 जून, डाउन पुणे-गोरखपूर (मंगळवार, शनिवार) 3 एप्रिल ते 29 जून आणि अप गोरखपूर-पुणे (गुरुवार, सोमवार) गाडीचा विस्तार 5 एप्रिल ते 1 जुलै, डाउन एलटीटी-गोरखपूर (गुरुवार) 1 एप्रिल ते 1 जुलै, अप गोरखपूर-एलटीटी (शनिवार) 3 एप्रिल ते 3 जुलै, डाउन पुणे-गोरखपूर (गुरुवार) 1 एप्रिल ते 1 जुलै, अप गोरखपूर-पुणे (शनिवारी) 3 एप्रिल ते 3 जुलै, डाउन पुणे-मंडुआडिह (सोमवारी) 5 एप्रिल ते 28 जून, अप मंडुआडिह- पुणे (बुधवार) ही गाडी 7 एप्रिल ते 30 जूनपर्यंत धावेल.

