रुग्णवाहिकेने चिरडले : पती-पत्नी ठार, तिघे जखमी


बुलढाणा : भरधाव रुग्णवाहिकेचे टायर फुटून रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोन कुटुंबातील पाच जणांना चिरडल्याने या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला तर तिघै जखमी झाले. हा अपघात 16 मार्चच्या रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास बुलडाणा शहरातील त्रिसरण चौकात घडला. विळे, कुर्‍हाडी, तवे विकून कुटुंबाची गुजराण करणार्‍या घिसाडी समाजाच्या पडोळकर व सोळंके कुटुंबावर या अपघाताने मोठा आघात झाला आहे.

पती-पत्नीचा मृत्यू
मध्यरात्री रुग्णवाहिका (एम.एच.28-7136) चिखलीवरून बुलडाण्याकडे भरधाव येत असताना अचानक रुग्णवाहिकेचे टायर फुटल्याने तिने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पाच जणांना चिरडले. अपघातात अनिल गंगाराम पडोळकर (29) यांचा जागीच मृत्यू झाला तर मायाबाई अनिल पडळकर (30, सर्व रा. पारधी बाबा मंदिराजवळ चिखली) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू ओढवला. या अपघातात बेबाबाई शेषराव सोळंके (35), आकाश अनिल पडोळकर (4), शेषराव लक्ष्मण सोळंके (40) हे जखमी झाले आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !