विशेष गाड्यांच्या सेवांच्या कालावधीचा विस्तार


भुसावळ : रेल्वेने खालील विशेष गाड्यांच्या धावण्याचा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे-गोरखपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस
05030 पुणे-गोरखपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस (दर शनिवारी) 3 एप्रिल ते 26 जूनपर्यंत धावणार आहे. 05029 गोरखपूर-पुणे विशेष एक्प्रेस (दर गुरुवारी) 1 एप्रिल ते 24 जूनदरम्यान धावणार आहे.


लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर दैनिक विशेष एक्स्प्रेस
05017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर दैनिक विशेष एक्स्प्रेस 3 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत व 13 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सेवा वाढविण्यात आल्या आहेत. 05018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस 1 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत धावणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोरखपूर एक्स्प्रेस
02598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोरखपूर एक्स्प्रेस 7 एप्रिल ते 30 जूनदरम्यान धावणार आहे. 02597 गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष एक्सप्रेस 6 एप्रिल ते 29 जूनदरम्यान धावणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा साप्ताहिक विशेष
05102 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस (दर गुरूवारी) 8 एप्रिल ते 1 जुलै दरम्यान धावणार आहे. 05101 छपरा -लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 6 एप्रिलपासून 29 जूनदरम्यान धावणार आहे. दरम्यान, 05017 ही गाडी दिनांक 11 व 12 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून चालविली जाणार नाही.

केवळ आरक्षीत तिकीट असल्यास प्रवेश
विशेष शुल्कासह लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व पुणे येथून सुटणार्‍या पूर्णपणे राखीव असलेल्या विशेष गाड्यांच्या विस्तारित सेवांचे बुकिंग दिनांक 19 मार्चपासनू आरक्षण केंद्रासह संकेत स्थळावर सुरू होत आहे. केवळ आरक्षीत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !