अट्टल घरफोड्या जाळ्यात
पिंपरी : अट्टल घरफोड्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार (वय 30, रा. जेऊर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 12 लाख 78 हजार 450 रुपये किमतीचे 33, तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. आरोपीच्या औरंगाबाद येथे जाऊन वाळूज परीसरातून वाळूज पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. हिंजवडी, देहूरोड, भोसरी, चाकण व आळंदी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपी पवार हा वाण्टेड आरोपी होता. दरम्यान, आरोपी गुन्ह्यातील मुद्देमाल संदीप अंकुश केत (रा. सम्राट चौक, अक्कलकोट, जि. सोलापूर) या व्यापार्याला विकल्याने त्यास अटक करण्यात आली.