लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार : तिघांविरुद्ध गुन्हा


संगमनेर : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर सात वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी पीडीत तरुणीच्या तक्रारीवरून प्रवीण गोरख नवले, गोरख गंगा नवले व रूपाली रामदास नवले (सर्व रा.मालदाड, ता.संगमनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण व संगमनेर शहरातील एका नगरात 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडीता संगमनेरात राहते. आरोपी प्रवीणशी तरुणीची काही वर्षांपूर्वी भेट झाल्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने 2014 पासून ते 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत या तरुणीवर अत्याचार केले. तसेच गोरख नवले व रुपाली नवले यांनी पीडित तरुणीला मारहाण शिवीगाळ व दमदाटीही केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !