दिड लाखांची लाच भोवली : तहसीलदार जाळ्यात
औरंगाबाद : दिड लाखांची लाच औरंगाबाद तहसीलदारांच्या अंगलट आली असून एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच तहसीलदार किशोर देशमुख यांना जालना एसीबीच्या पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री 11 वाजता रेल्वे स्टेशन परीसरात ही कारवाई करण्यात आली. वाळू वाहतूकदार तक्रारदाराचा पकडलेला हायवा ट्रक सोडण्यासाठी सकारात्मक अहवाल तसेच दरमहा कारवाई न करण्यासाठी आरोपी तहसीलदाराने महिन्याला तचार लाख 70 हजारांची लाच मागत दर महिन्याला तीन लाख रुपये हप्ता देण्याची मागणी केली होती. त्यातील दिड लाखांची रक्कम सोमवारी तहसीलदाराने मागितल्यानंतर पथकाने सापळा रचून तो यशस्वी केला. पोलिस उप अधीक्षक रविंद्र निकाळजे आणि त्यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.