मुंबईतील 86 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या


65 अधिकारी मुंबई क्राईम ब्रँचचे : मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढले आदेश

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी क्राईम ब्रांचमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. या शाखेच्या 65 अधिकार्‍यांसह एकूण 86 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काहींना पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर देण्यात आली आहे. तर काहींची साईड ब्रांचमध्ये बदली करण्यात आली. क्राइम इंटेलिजन्स युनिटचे अधिकारी आणि सचिन वाझे निकटवर्तीय मानले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज काझी यांना सशस्त्र पोलीस दल या विभागात बदली देण्यात आली आहे, तर क्राइम इंटेलिजन्स युनिटचेच प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. क्राइम ब्रांचमध्ये गेल्याकाही वर्षांपासून असलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षकपदी अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. मुकेश अंबानी प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिसांवर प्रशचिन्ह उपस्थित झालं होतं.

86 अधिकार्‍यांच्या बदल्या
28 पोलिस निरीक्षक, 17 सहा.पोलिस निरीक्षक आणि 20 पोलीस उप निरीक्षकांची बदली करण्यात आली तसेच इतर 21 अधिकार्‍यांची ही बदली केली गेली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !