अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : आरोपीला अटक


वाळूज महानगर : अल्पवयीन तरुणीला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणार्‍या आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलि ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत आरोपीला अटक करण्यात आली. पवन दुगमोगरे (21, रा.रांजणगाव परीसर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडीतेच्या वडिलांचे निधन झाल्याने रांजणगाव परीसरात मावशीकडे वास्तव्यास होती. मावशी व काका हे दोघे 16 मार्चला कामासाठी घराबाहेर पडल्याने घरमालकाने तिच्या मावशीला संपर्क साधून, मुलगी घरी नसल्याचे सांगितले. पोलीस तपासा, तिला पवन दुगमोगरे (21, रा. रांजणगाव परिसर) याने आमिष दाखवून पळवून नेल्याचे समोर आले. पवन तिला घेऊन भांगसीमाता गड परीसरात घेवून गेला व या परीसरात एक दिवस मुक्काम केल्यानंतर त्याने तिला पुण्यात शिवाजीनगरात नेले. पुण्यात त्याने तिच्यावर अत्याचार केले. पैसे संपल्यानंतर पवन तिला घेऊन मंगळवारी वाळूज एमआयडीसीत परत आला. पोलिसांनी पवनच्या तावडीतून तिची सुटका केली. वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपी पवन दुगमोगरे यास अटक केली.

 


कॉपी करू नका.