दोन चिमुकलींसह पित्याचीही आत्महत्या


पुणे : पोटच्या दोन लहानग्या चिमुरड्यांसह पित्यानेही आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे ही घटना घडली. राजेंद्र भुजबळ व दीक्षा भुजबळ आणि ऋतुजा भुजबळ अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. राजेंद्र भुजबळ यांनी 23 तारखेला पत्नीला वानवडी येथे पाठवल्यानंतर दीक्षा आणि ऋतुजा या दोन मुलींना घेऊन तळेगाव ढमढेरे गाठले. सायंकाळी गावातील शेणाचा मळा या ठिकाणी उत्तम भुजबळ यांच्या विहिरीच्या कडेला राजेंद्र भुजबळ व त्यांच्या मुलींच्या चपला, मोबाईल पैसे पडल्याचे उत्तम यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ यासंदर्भात शिक्रापूर पोलिसांना कळवले. पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकातील कर्मचार्‍यांनी नागरीकांच्या मदतीने विहिरीत या तिघांचा शोध सुरू केला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !