सेल्फी पडला दोघा भावंडांच्या जीवावर
मालेगाव : सेल्फी दोघा भावंडांच्या जीवावर बेतल्याची घटना विराणे धरणाकाठी घडली. या घटनेत हर्षल देवीदास जाधव (22) व रितेश देवीदास जाधव (18) या भावंदांचा मृत्यू ओढवला, हर्षल हा नाशिक येथे इंजिनीअरिंगच्या दुसर्या वर्षाला तर रितेश हा मालेगावी मसगा महाविद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. दोघे भाऊ बुधवारी मालेगावाजवळील निमशेवडी येथून एक लग्न समारंभ आटोपून मोटार सायकलने परत येत असता रस्त्यानी त्यांनी धरणावर जाण्याचा बेत आखला. सेल्फी घेण्याच्या नादात लहान भाऊ रीतेशचा पाय घसरला. त्याला वाचवण्याच्या नादात हर्षल देखील बुडाला.