सनराईझ रुग्णालयाला आगीत दहा जणांचा मृत्यू


मुंबई : भांडूप परीसरातील सनराईझ रुग्णालयाला लागलेल्या लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री 12 वाजेनंतर घडली. मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज रुग्णालयापर्यंत पोहोचला. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. या रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहितीही महापौर यांनी दिली. ड्रीम्स मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना रात्री 12.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी सखोल चौकशी करत, दोषीवर कारवाई करण्यात येईल असे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !