अमळनेरातील दोघांचा बोरी नदीत बुडाल्याने मृत्यू


अमळनेर : अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला परीसरातील दोघा तरुणांचा हिंगोणे शिवारातील बोरी नदीत पोहताना बुडाल्याने मृत्यू झाला. दानिश शेख अरमान (16) व शाहिद खान रहेमान खान (17) अशी मयतांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली.


कॉपी करू नका.