विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्या पहिल्या यादीत तरुणांना मिळणार संधी!
नवी दिल्ली : काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आता तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाईल व काँगे्रसच्या पहिल्याच यादीत त्यांना स्थान दिली जाणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजे विरोधात लढावे, अशी काँग्रेसने विचारणा केली होती असा खुलासाही बाळासाहेब थोरात यांनी केला.