मंत्रालयात दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न


मुंबई : दिव्यांगाच्या कायम विना अनुदानित शाळांचा ‘कायम शब्द’ काढण्यासाठी गेले अनेक वर्षांपासून लढणार्‍या शिक्षक संस्थाचालक आणि शिक्षकांनी आज मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यातील एका संस्था चालकासह अन्य दुसर्‍या एका शिक्षकाने मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर उडी मारून आंदोलन केले. यामुळे पोलीस यंत्रणेची जोरदार पळापळ झाली.


कॉपी करू नका.