अट्टल चैन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
कोल्हापूर : कर्नाटक राज्यातील अट्टल चैन चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जयसिंगपूर येथे अटक केली आहे. मोहमद फिरोज इराणी (21, रा. खाजा वस्ती, इराणी चाळ, रेल्वे स्टेशन, सांगली. मूळगाव- जन्नतनगर, धारवाड, रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या चेन स्नॅचरचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेली सोन्याची चेन व दुचाकी असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगतकरण्यात आला तर त्याचा दुसरा साथीदार दादू राजहुसेन इराणी (रा. खाजा वस्ती, इराणी चाळ, सांगली) हा अद्याप पसारआहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. महाडिक वसाहत येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. गुन्हा करताना चोरट्यांनी वापरलेली दुचाकी जयसिंगपूर येथे घेऊन चोरटे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते उदगाव या मार्गावर सापळा रचला. त्यावेळी त्याच वर्णनाची दुचाकी घेऊन येणार्यास पोलिसांनी अडवले. दुचाकीबाबत खात्री करुन दुचाकीस्वार मोहमद इराणी याला ताब्यात घेतले. त्याने कोल्हापुरात महाडिक वसाहत येथे चेन स्नॅचिंगचा गुन्हा केल्याचे कबूल केले, त्याच्याकडून चोरलेली सोन्याची चेन व दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचा साथीदार दादू इराणी हा अद्याप पसार असून त्याचा शोध सुरु आहे.