कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना दिलासा : ‘तो’ खटला रद्द


अहमदनगर : स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदुरीकर यांनी केल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदुरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदुरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता. इंदुरीकर महाराज यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केले? याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा करून या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांचे अपील मंजूर करीता तो खटला रद्द केल्याने इंदुरीकर महाराजांना आठ महिन्यानंतर मोठा दिलासा मिळाला आहे.

 


कॉपी करू नका.