पत्रकाराचा मोबाईलसह कॅमेरा लांबवणारा गुन्हेगार ‘नाकतोड्या’ जाळ्यात


जळगाव : पत्रकार अल्ताफ इस्माईल शेख (30, रा.शेरा चौक, मेहरूण) यांच्याकडील कॅमेरा व मोबाईल दुचाकी (एम.एच.19 सी.डी.3313) क्रमांकाच्या दुचाकीवर धूम स्टाईल ट्रिपल सीट आलेल्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 29 रोजी भरदिवसा घडली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी आकाश उर्फ नाकतोडा संजय मराठे (21, रा. चौघुले प्लॉट) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेला कॅमेरा, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, राहूल पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.