राज्यासह एमपीतून उत्तराखंड राज्यात जाणार्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य
भुसावळ : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातून उत्तराखंड राज्यातून जाणार्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह रीपोर्ट अनिवार्य करण्यात आले आहे. भुसावळ विभागातील महाराष्ट्र ,मध्यप्रदेश राज्यातून प्रवास करण्यार्या प्रवाशांना उत्तराखंड राज्यात पोहोचण्याआधी 72 तास आधी कोविडची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह रीपोर्ट तपासणी करून रिपोर्ट सोबत ठेवणे अनिवार्य आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.