मनसेची पदाधिकार्‍यांची हत्या : युपीतील शूटर जाळ्यात


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी जमिल शेख यांच्या हत्येप्रकरणी शूटर इरफान सोनु शेखला उत्तर प्रदेशच्या एसटीएस टीमने 3 एप्रिल रोजी लखनौ येथील कठोता परीरसरातून अटक केली आहे. ठाणे क्राईम ब्रांचला इरफान हा उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांकडे त्याला अटक करण्यास मदत मागितली होती. ज्यानंतर उत्तर प्रदेश एसटीएफने एक टीम बनवली आणि इरफानचा शोध सुरू केला. 23 नोव्हेंबर 2020 रोजी राबोडी येथे दिवसा-ढवळ्या जमीन शेख यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती व ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

जमीन व्यवहारातून हत्येचा संशय
जमिल शेखला मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे नगरसेवक नजीबुल्लाहने सुपारी दिली होती, असा दावा यूपी एसटीएफने शुटर इरफानच्या अटकेनंतर केला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जमिल शेख मनसे पक्षाचे पदाधिकारी असून एक आरटीआय कार्यकर्ताही होते. ते वारंवार नजीबुल्लाह विरोधात तक्रार करत होते. जमिनीच्या व्यवहारामुळे ही हत्या करण्यात आली , अशी माहीती यूपी एसटीएफने त्यांच्या प्रेसनोटमध्ये दिली आहे. तर मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया नजीबुल्लाह यांनी दिली आहे.


कॉपी करू नका.