दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवासा रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला


अचलपूर : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अचलपूर न्यायालयात आयएफएस दर्जाचे रँक दर्जाचे असणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्रीनिवासा रेड्डी यांनी अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केल्यानंतर शनिवारी अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावली झाली. हा अटकपूर्व फेटाळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या पूर्वी सुसाईट नोटमध्ये वरीष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं पत्र त्यांनी श्रीनिवासा रेड्डी यांना लिहलं होते. याप्रकरणात आयएफएस विनोद शिवकुमार यांना अटक झाली आहे.

 


कॉपी करू नका.