कोरोना सुसाट : 14 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1179 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 93 हजार 600 वर : एकाच दिवसात 1159 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तब्बल 1179 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1682 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 93 हजार 600 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 80 हजार 339 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर रविवारी एकाच दिवसात 1159 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

रविवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 248
जळगाव ग्रामीण 23
भुसावळ 155
अमळनेर 51
चोपडा 257
पाचोरा 36
भडगाव 39
धरणगाव 61
यावल 52
एरंडोल 37
जामनेर 55
रावेर 68
पारोळा 32
चाळीसगाव 06
मुक्ताईनगर 09
बोदवड 49
अन्य जिल्हा 01


कॉपी करू नका.