वरणगावात दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरीक संतप्त


कोरोना काळात आजाराला निमंत्रण ; पाणीपुरवठा अभियंत्याला विचारला जाब

वरणगाव : नगरपालिकेच्या जलवाहिनीतून प्रभाग क्रमांक दोनमध्ये गटारीच्या वासासारखे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा गेलया अनेक दिवसांपासून सुरू असल्यानेे मंगळवारी दुपारी 12 वाजता संतप्त स्थानिक रहिवाशांनी नगरपालिकेत धडक देऊन पाणीपुरवठा अभियंता चाटे यांना जाब विचारत दुर्गंधी युक्त पाणी पिण्यास सांगितले. तुम्ही हे पाणी पीत नाही, मग आम्ही माणसे आहेत की जनावरे आम्हाला ? असे पाणी कोरोना काळात मिळेल तर आजाराला निमंत्रण नाही तर काय? असा संताप रहिवास्यांनी व्यक्त केला. पाणीपुरवठा अभियंता भरत चाटे यांनी स्वतः येऊन पाहणी करतो आणि गटारी जवळील लिकेज तत्काळ दुरुस्ती करतो, असे आश्वासन दिल्याने रहिवासी माघारी फिरले.

तक्रारींकडे केले दुर्लक्ष
प्रभाग क्रमांक दोन मधील गिदाळी आखाडा या भागात बर्‍याच दिवसापासून नगरपालिकेच्या जलवाहिनीतून गटारीच्या वासासारखा उग्र दुर्गंधी युक्त पाणीपुरवठा होत होता. ही माहिती स्थानिक रहिवाशी यांनी नगरपालिका पाणीपुरवठा कर्मचारी यांना सांगितली. परंतु याकडे नगरपालिका कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याची माहिती रहिवासी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांना सांगितली. मंगळवारी दुपारी 12 वाजता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांच्या नेतृत्वाखाली संतप्त रहिवास्यांनी नगरपालिकेत दुर्गंधीयुक्त पाणी घेऊन थेट पाणी पुरवठा अभियंता भरत चाटे यांना ते पाणी पिण्यास सांगितले. परंतु चाटे यांनी हे पाणी पिण्यास नकार दिला. तुम्ही हे पाणी पिऊ शकत नाही मग आम्ही का जनावरे आहेत का? आम्हाला असे पाणी पिण्यास तुम्ही देत आहे. सध्या कोरोनासारखी महामारी सुरु आहे. दुर्गंधी युक्त पाणी पिऊन बर्‍याच नागरीकांना जुलाबाचा त्रास सुरु झाला आहे. आजारी पडले तर डॉक्टर घेत नाही आहे, आमच्याकडे मोठ्या दवाखान्यात ऍडमिट करण्यासाठी पैसे नाही, असा संताप रहिवाशांनी व्यक्त केला. तुम्ही तत्काळ याकडे लक्ष घाला. आणि दुर्गंधी युक्त होणारा पाणी पुरवठाची लिकेज जलवहिनी दुरुस्ती करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे संतोष माळी आणि स्थानिक रहिवासी यांनी पाणीपुरवठा अभियंता भरत चाटे यांना केली. दूषित पाणीपुरवठा करणारी लिकेज जलवाहिनी तात्काळ दुरुस्ती करतो, असे आश्वासन भरत चाटे यांनी संतोष माळी आणि रहिवाशांना दिले.




यांची होती उपस्थिती
यावेळी फिरोज खान दौलत खान, शेख मुज्जीमिल, सय्यद अझहरअली, अय्युब खान, आवेस खान, जाकीर खान, युनूस मिजवान, आरीफ शेख, कमील खान, इद्रिस खान, आवेस खान, अब्रार खान, शोएब खान, अतुल माळी, अबूबकर खान, सय्यद मझहर आदी उपस्थित होते.

भरत चाटे यांनी शोधली लिकेज जलवाहिनी
प्रभाग दोन मधील रहिवासी आणि संतोष माळी यांनी नगरपालिकेत दूषित पाणी घेऊन गेल्यानंतर पाणीपुरवठा अभियंता चाटे यांनी लगेच नगरपालिका कर्मचारी तळेले यांना सोबत घेऊन गिदाळी आखाडा येथे लिकेज जलवाहिनीची पाहणी केली. यावेळी महिलांनी भांड्यामध्ये दुर्गंधीयुक्त दूषित पाणी आणून चाटे यांना पाण्याचा वास घेण्यास सांगून संताप व्यक्त केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !