अल्पवयीनावर अत्याचार करीत केले गर्भवती


पुणे : 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करून तिच्या लग्न करण्यात आल्याची घक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी तरुणाविरुद्ध याप्रकरणी वानवडी पोलिसांनी नागेश दशरथ लांडगे (वय 25, रा. साठेनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारीपासून 6 एप्रिलपर्यंत पिडिताच्या घरी तसेच आरोपीच्या घरी घडल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सहायक फौजदार मुनीर अब्बाज इनामदार यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वानवडी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नागेश लांडगे याने एका 16 वर्षांच्या युवतीबरोबर लग्नापूर्वी तिच्या घरी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याबरोबर लग्न केले. तिच्यावर अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याचा आरोप आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे


कॉपी करू नका.