भाजपाचे विचारधारा घरा-घरापर्यंत पोहचविणार
गजानन वंजारी : वरणगाव नगरपरीषदेवर विकासाच्या जोरावर भाजपाचा झेंडा फडकणारच व्यक्त केला विश्वास
वरणगाव : भाजपाची विचार घरा-घरापर्यंत पोचविणार आहे. वरणगाव शहरात कधी नव्हे एवढे विकासाची कामे नगरपरीषदेच्या माध्यमातून भाजपाने कामे केली असून त्या जोरावर नगरपरीषदेवर भारतीय जनता पार्टी चा झेंडा फडकविल्या शिवाय कार्यकर्ता शांत बसणार नाही, असा विश्वास गजानन वंजानी यांनी येथे व्यक्त केला. वरणगाव भाजपातर्फे भाजपा कार्यलयात स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनील माळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाले, जेष्ठ नेते हाजी अल्लाउद्दीन सेठ. शामराव धनगर, गोलू राणे, हितेश चौधरी, महिला आघाडी शहराध्यक्षा प्रणिता पाटील चौधरी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, कमलाकर मराठे. डॉ.चांदने, भाजयुमो सरचिटणीस आकाश निमकर, पप्पू ठाकरे, जयेश कपाटे, मिलिंद भैसे, गणेश चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी गजानन भाऊ वंजारी यांनी

वरणगावात कमळ फुलणार
गजानन काळे म्हणाले की, मतदार हा भाजपा ला मतदान करण्यासाठी इच्छुक असतो. मी तरी पक्षासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. कार्यकर्त्यांनो वरणगाव शहरात भाजपाचीच सत्ता येणार आहेत, काळजी करू नका. जो आये उसके साथ, जो ना आये उस्के बिना चलते रव्हो, नतिजा कुछ भी हो, दिया वही जलाना है ! असे गजानन वंजारी आपल्या भाषणात म्हणाले. आभार महिला मोर्च्याच्या शहराध्यक्ष प्रणिता पाटील यांनी मानले.
