कोंबड्या फेकून, हवेत फुगे सोडणे ही काय आंदोलने झाली ?

जलसंपदा मंत्र्यांचा विरोधकांना सवाल : नाशकातील सभा रेकार्डब्रेक होणार
नाशिक : कडकनाथ कोंबड्या हवेत भिरकावणे, हवेत चार काळे फुगे सोडणे ही काय आंदोलने झाली ? असा सवाल राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विरोधकांना उपस्थित केला. आमच्या काळात आम्ही विरोधक म्हणून कसं आंदोलन केले नाही तर आता विरोधकांकडून कशी आंदोलन होत आहेत ? असा चिमटा गिरीश महाजन यांनी विरोधकांना काढला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा गुरुवारी नाशिकमध्ये समारोप होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आजची सभा खूप मोठी होईल. नाशिकमध्ये कधी एवढी मोठी सभा झालीच नसेल, असा दावाही महाजन यांनी केला.
