हर्सूल पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदार औरंगाबाद एसीबीच्या जाळ्यात


औरंगाबाद : चार हजारांची लाच घेताना हर्सूल पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटा हर्सूल ठाण्याच्या परीसरात गुरुवार, 19 सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात आली. सतीश यशवंतराव जाधव असे अटकेतील लाचखोर हवालदाराचे नाव आहे. तक्रारदाराविरोधात पोलिस ठाण्यात अर्ज आल्यानंतर त्याची चौकशी जाधव यांच्याकडे आली. जाधव यांनी तक्रारदार यांना ठाण्यात बोलावून अर्ज निकाली काढण्यासाठी चार हजार लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार नोंदविली. गुरुवारी सकाळी लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील एसीबीच्या पोलिसांनी आरोपीस अटक केली.


कॉपी करू नका.