आर.जे मलिष्कानं केली खड्ड्यांवरुन मुंबई महापालिका आणि प्रशासनाची पोलखोल


मुंबई : चंद्र तर थेट मुंबईतल्या रस्त्यावर उतरलाय, अशा आशयाचं गाणं तयार करीत आर.जे मलिष्कानं पुन्हा एकदा खड्ड्यांवरुन मुंबई महापालिका आणि प्रशासनाची पोलखोल केल्याने खळबळ उडाली आहे. ‘चांद जमीन पर’ म्हणजेच ‘चंद्र उतरला रस्त्यावर’ या मथळ्याखाली हे गाणं मलिष्कानं तयार केलं आहे. खड्ड्यांवरुन याआधीही बीएमसीला खडे बोल सुनावणार्‍या मलिष्काचा हा व्हिडीओ मात्र पालिका सत्ताधार्‍यांना चांगलाच झोंबला आहे.

मलिष्काला मुंबईची समज नाही
मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मलिष्काला मुंबईची समज नाही असं म्हणलं आहे. यापूर्वी मलिष्काला पालिका पावसाळ्यापूर्वीच कसं काम करते हे दाखवून झालंय. खुद्द आयुक्तांनी मलिष्कासोबत आपातकालीन विभाग, मुंबईतील पंपिंग स्टेशन्स यांचा दौरा केला होता. मात्र तरीदेखील केवळ टीका करायची म्हणून अशी गाणी रचली जातात. खड्डयांबाबत प्रशासन आपलं काम करत आहे. वेबसाईट, ट्विटरद्वारे खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त होतात. सोबतच, पालिकेचे कर्मचारी स्वत: ठिकठिकाणी जाऊन खड्डे भरत आहेत. तक्रारी प्राप्त होताच मुंबईतील खड्डे भरले जातायेत.” असं यशवंत जाधव यांनी सांगितलं आहे. मात्र, विरोधकांनी मलिष्काच्या या गाण्यानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


कॉपी करू नका.