भाजपचे गटनेते व नगरसेवक मुन्ना तेलींचा राजीनामा


भुसावळ : पालिकेच्या निवडणुका काही महिन्यांच्या उंबरठ्यावर असतानाच भुसावळातील भाजपचे सत्ताधारी गटनेते मुन्ना तेली यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे दिल्यानंतर भुसावळातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या राजीनाम्याला अनेक कंगोरे असल्याचे बोलले जात असल्याने आगामी राजकारण आता कुठल्या रंजक दिशेने असेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या राजीनाम्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही, खाजगी कामे वाढल्याने राजीनामा दिल्याचे मुन्ना तेली यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !