भुसावळातील ट्रामा सेंटर आगामी काळात नावारूपाला आणणार !


जिल्हा शल्यचिकित्सकांची भुसावळात भेटीप्रसंगी ग्वाही : रुग्णांची घेतली माहिती ; ऑक्सीजन पुरवठादाराला गुरुवारी धनादेश देणार असल्याची दिली माहिती

भुसावळ : शहरातील ट्रामा केअर सेंटरसह ग्रामीण रुग्णालयात बुधवारी राम नवमीनिमित्त भाजपा पदाधिकार्‍यांकडून सर्व रुग्णांना राम रक्षा स्तोत्र वाटप करीत असताना सायंकाळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी अचानक भेट दिली असता पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी नागोराव चव्हाण यांनी रुग्णांची विचारपूस करीत त्यांना राम रक्षा स्तोत्र दिले. भुसावळातील ट्रामा सेंटर आगामी काळात नावारूपाला आणणार असल्याची ग्वाही पदाधिकार्‍यांच्या चर्चेदरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण यांनी दिली.

ऑक्सीजन ठेकेदाराला गुरुवारी मिळणार धनादेश
ट्रामा केअर सेंटरला तारा एजन्सीचे तन्मय बेंडाळे यांच्याकडून ऑक्सीजनचा पुरवठा होत असलातरी त्यांचे बिल अडकले होते. या संदर्भात भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील यांनीदेखील वरीष्ठ स्तरावर तक्रार करून आवाज उचलला होता. बुधवारी देखील त्यांनी या संदर्भात चव्हाण यांच्याशी चर्चा केली व ठेकेदाराशी संवाद साधून दिला. ठेकेदाराचा बिलाचा प्रश्‍न सुटला असून गुरुवारी त्याला धनादेश मिळणार असल्याचे ते म्हणाले. रामनवमी निमित्त 56 रुग्णांना रामरक्षा स्तोत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सोशल डिस्टन्सचे पालन करून भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील, सरचिटणीस संदीप सुरवाडे, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, सक्रिय कार्यकर्ते गिरीश्म पाटील तसेच मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर नितीन चौधरी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !