दाम्पत्याच्या खुनाने कुसुंबा हादरले


कारण अस्पष्ट : पोलिसांची घटनास्थळी धाव

जळगाव : गळा आवळून दाम्पत्याचा खून करण्यात आल्याची घटना कुसुंबा गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी-पत्नीचा गळा आवळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले आहे. इमारतीच्या गच्चीवर पतीचा तर किचन लगतच्या खोलीत पत्नीचा मृतदेह आढळला. मुरलीधर राजाराम पाटील (वय 47), आशाबाई मुरलीधर पाटील (38, दोघे रा. स्वामी समर्थ शाळेमागे. कुसुंबा) अशी मयतांची नावे आहेत. दरम्यान घटनास्थळी एमायडीसी पोलिसांनी धाव घेतली आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विभागीय अधिकारी कुमार चिंथा, स्थानिक गुन्हे शाखेचे किरण बकाले यांच्यासह एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !