भाजपा ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद नेमाडेंनी ट्रामा केअर सेंटरसाठी दिले ऑक्सीजन सिलिंडर
भुसावळ : भुसावळातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा लायन्सचे माजी अध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नुकतेच ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर स्वखर्चाने दहा ऑक्सीजनचा सिलिंडर पुरवठा केल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन सिलिंडर नसल्याचे रुग्णांची गैरसोय होत असल्याबाबत जागृक नगरसेवक नेमाडे यांना कळताच त्यांनी स्वखर्चाने दहा सिलिंडरचा रुग्णालयाला पुरवठा केला. जनसेवा हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे नेमाडे यांनी सांगत यापुढे मदत करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले.

