खिचडी बनवणार्‍या अंजनगाव सुर्जीच्या बबिता ताडे बनल्या ‘करोडपती’


अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील खिचडी बनवणार्‍या बबिता ताडे (40) यांनी कौन बनेगा करोडपती स्पर्धेत तब्बल एक कोटी जिंकले. अजंनगाव सुर्जी येथील पंचफुलाबाई हरणे विद्यालयात 450 विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवण्याचे काम करणार्‍या बबिता ताडे करतात. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभाग नोंदवत त्यांनी तब्बल एक कोटी रुपये जिंकले आहेत. त्यांचे पतीदेखील त्याच विद्यालयात शिपाई आहेत.


कॉपी करू नका.