रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारे 11 संशयीत जाळ्यात
जिल्हा पोलिस अधीक्षकांची माहिती : 1200 चे इंजेक्शन विकले 16 ते 30 हजारांचा : जिल्ह्यात आणखीन धडक कारवाईची गरज
जळगाव : जळगाव पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये रेमडसिवीरचा काळा बाजार करणारे 11 संशयीत पकडून त्यांच्याकडून सात रेमडेसिवीर अन्य दुचाकी व मोबाईल मिळून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी माहिती दिली. शुक्रवारी पोलिसांच्या दोन पथकांनी रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळाबाजार करणारे नऊ आरोपी एका कारवाईत पकडले तर डॉक्टर पसार झाला तर दुसर्या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपींना रेमडेसिवीरचा आरोपींना पुरवठा झाला कसा? व या साखळीतील झारीचे शुक्रचार्य नेमके कोण? यांच्यावरही कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस हेकॉ विजय कोळी, कैलास सोनवणे, पुना महाले, पो कॉ रवींद्र पवार , प्रशांत पाठक , रवींद्र साबळे , फिरोज तडवी यांचा समावेश होता या पथकाने स्वातंत्र्य चौकात कारवाई केली.






स्वातंत्र्य चौकात या आरोपींना अटक
शेख समीर (23, शिवाजी नगर), लालचंद कुंभार (25, खंडेराव नगर) सुनील मधुकर अहिरे (32, हरी विठ्ठल नगर), झुल्फिकार अली निसार अली सय्यद (21, ईस्लामपुरा, धानोरा, ता.चोपडा), कयूम (28, मास्टर कॉलनी), डॉ .आलीम मोहम्मद खान, सय्यद आसिफ सय्यद दिसा व बावीस राणा (खुबा मशिद जवळ सुप्रीम कॉलनी), अजीम शहा दिलावर शाह (सालारनगर), जुनेद शहा जॅकी शहा (23, ओवस पार्क, सालारनगर) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडूनन दोन दुचाकींसह पाच रेमडेसीवीर इंजेक्शन असा दोन लाख 46 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशशीयांनी 22 ते 27 हजार, 30 हजार व 33 हजार अशा महाग दरात इंजेक्शन विकले.
जिल्हा पेठ हद्दीतच दुसरी कारवाई ः तिघे जाळ्यात
जिल्हा पेठ हद्दीतच दुसरी कारवाई करण्यात आली. यात शुभम राजेंद्र चव्हाण (22, रा.झुरखेडा, ता.धरणगाव), मयूर उमेश विसावे (27, रा – श्रद्धा कॉलनी नंदनवन नगर) आकाश अनिल जैन (26, रा.मानस बिल्डिंग आंबेडकर मार्केटजवळ, व्यवसाय- मेडिकल नवकार फार्म) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून दोन रेमडेसीवीर इंजेक्शनसह मोटारसायकल व मोबाईल मिळून एक लाख 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . ही कारवाई पोलिस निरीक्षक विलास शेंडे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बोरसे यांच यांच्यासह पुना बागुल, प्रवीण भोसले, रवींद्र तायडे, मनोज पवार, योगेश ठाकूर, फिरोज तडवी यांनी केली.
