मोरगाव खुर्द येथे पाच बाधीत आढळले
रावेर : जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी आपल्या मोरगाव खुर्द या गावात कोरोना स्प्रेड रोखण्यासाठी अँटीजन स्टेट कॅम्प लावला. यात 124 ग्रामस्थांची टेस्ट केल्यानंतर पाच बाधीत आढळले. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, समाजसेवक प्रल्हाद पाटील यांनी ग्रामपंचायत मोरगाव खुर्द यांच्या माध्यमातून कोरोना संदर्भात जन-जागृती केली. गावात अँटीजन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. यामध्ये 124 लोकांची तपासणी करण्यात आली. यासाठी आरोग्य सेवक दिनेश चौधरी, राजेंद्र भालेराव, आशावर्करजयश्री पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी सहकार्य केले.