यावल काँग्रेसच्या शहराध्यक्ष सुरेखा पारधे यांचे अल्पशा आजाराने निधन
यावल : विरारनगर परीसरातील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यावल शहराध्यक्ष सुरेखा सीताराम पारधे (35) वर्ष रविवारी अल्पशा आजाराने गोदावरी रुग्णालयात उपचार घेताना दुपारी तीन वाजता निधन झाले. सुरेखा पारधे यांची महिलांच्या सामाजिक व विविध प्रश्नासाठी धावुन जाणार्या कार्यकर्त्या म्हणून ओळख होती. एक महिला म्हणुू संघर्षमय जिवन जगणारी आमची उमदा कार्यकर्ता निघुन गेल्याचे आपल्या शोकसंदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी म्हटले. सुरेखा पारधे यांच्या पश्चात कुटुंबात आई, बहिण, पुतण्या, पुतणी असा परीवार आहे.




