दोन कारच्या धडकेत तीन जण ठार
औरंगाबाद : दोन कारमध्ये धडक होवून झालेल्या अपघात तीन जण ठार झाले. शनिवारी रात्री 11.30 वाजेदरम्यान ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यासमोरील पोलीस चौकीसमोर ही घटना घडली. या अपघातात दीपक खोसरे (45, रा. गल्लेबोरगाव), मदन अशोक जगताप (28), राजू आसाराम मानकीकर (34, रा.गल्लेबोरगाव) यांचा मृत्यू झाला. तर यातील एकावर औरंगाबादच्या घाटीत, तर दुसर्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री औरंगाबादहून खुलताबादकडे जाणारी एसयूव्ही कार (एमएच-20 सीएस-5462) आणि खुलताबाद येथून औरंगाबादकडे येणार्या कार (एमएच-20 डीजे-1771) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. कारमधील सुनील कृष्णा अवटे (43, रा. कसाबखेडा), राजू रंगनाथ वरकड (47, रा. ज्योतीनगर, औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.