भुसावळ-पुणे विशेष गाडीचा विस्तार
भुसावळ : मध्य रेल्वेने भुसावळ-पुणे विशेष गाडीची सेवा 30 जुलै 2021 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. 01136 पुणे-भुसावळ विशेष (दर शुक्रवार) सेवा 7 मे 2021 पासून 30 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे आणि 01135 भुसावळ-पुणे विशेष (गुरुवार) सेवा 6 मे 2021 पासून 29 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच 01451 पुणे -दानापूर विशेष (बुधवार) 5 मे 2021 पर्यंत (1 फेरी) वाढविण्यात आली आहे. 01310 दानापूर-नागपूर विशेष (शुक्रवार) 7 मे 2021 पर्यंत (1 फेरी) वाढविण्यात आली आहे. या विशेष गाड्यांच्या संरचनेत, थांब्यांमध्ये आणि वेळेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड 19 शी संबंधित सर्व नियमांचे व एसओपी पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.




