शिरसाडच्या अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

यावल : तालुक्यातील शिरसाड येथील 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुणवंता अरुण कोळी असे मयत विद्यार्थिनीचे नाव असून ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. शिरसाड गावातील प्लॉट एरीया भागात अरुण गोकुळ कोळी हे परीवारासह राहतात. शुक्रवारी सकाळी शेतात ते कामाला गेल्यानंतर दुपारी दोन वाजता घरी परतले असता घरात त्यांची इयत्ता दहावीत शिक्षण घेणारी मुलगी गुणवत्ता कोळी हिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तत्काळ मृतदेह काढून यावल ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर डॉ. एन.डी. महाजन यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. दरम्यान, विद्यार्थिनीने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलिसात अरुण कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अशोक जवरे करीत आहेत.
