पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी कुर्हाकाकोड्यातील आरोपी पतीला तीन वर्ष शिक्षा
मुक्ताईनगर : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याप्रकरणी तालुक्यातील कुर्हाकाकोडा येथील पतीला मुक्ताईनगर न्यायालयाचे न्या.एस.ए.सरदार यांनी 20 हजार रुपये दंड तसेच तीन वर्ष सश्रम कारावासची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास चार महिन्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. राजू उत्तम बेलदार (कुर्हाकाकोडा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. बेलदार यांनी पत्नीला त्रास दिलयाने त्यांच्या पत्नीने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत आत्महत्या केली होती. विवाहितेच्या मृत्यूपूर्व जबाबावरून पती बेलदारविरुद्ध 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी वकील अॅड.निलेश जाधव यांनी सहा साक्षीदार तपासले. तपासी अधिकारी म्हणून हवालदार सुधाकर शेजोळे यांनी तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार रघुनाथ पवार, नीलेश श्रीनाथ, रवींद्र सपकाळे यांनी काम पाहिले.