अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती : आरोपीला अटक

धुळे : 12 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी बापू सोमा हातगीर (42, रा.नवलाणे, मेहरगाव) यास अटक करण्यात आली. पीडीता आजोबाकडे वास्तव्यास असल्यानंतर आरोपीने पीडीतेशी जवळीक वाढवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडीतेचे पोट दुखत असल्याने वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. पीडीतेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
