भुसावळ मतदारसंघांच्या चौफेर विकासासाठी चार कोटींची कामे
भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची माहिती : निधी खर्च करण्यात दावा आखडल्याचा दावा चुकीचा
भुसावळ : भुसावळ मतदारसंघाच्या चौफेर विकासाठी सुमारे तीन कोटी 86 लाख रुपयांची विकासकामे आधीच करण्यात आली असून या माध्यमातून मतदारसंघाचा विकास साधण्यात आला आहे शिवाय यापुढेदेखील विकासकामांची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असल्याची माहिती भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांनी दिली. ते म्हणाले की, आमदार निधीतील कामांचे आधीच नियोजन केले जाते शिवाय भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात तीन कोटी 86 लाख रुपयांची कामे करण्यात आली आसून कंत्राटदारांची बिले न मिळाल्याचा अर्थ निधीसाठी हात आखडता असा मुळीच नाही. कंत्राटदारांना त्यांची बिले मिळणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून यात आमचा कुठलाच हस्तक्षेप नसतो. विकासकामे करण्यासाठी कधी कधी तर निधीही कमी पडतो, असेही आमदार संजय सावकारे म्हणाले.
निधीबाबत हात आखडता हा दावा चुकीचा
आमदार म्हणाले की, काही कंत्राटदारांची देयके बाकी असली तरी ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आमदारांनी निधी खर्च करण्यात हात आखडता केल्याचा दावा निश्चितच चुकीचा आहे. जिल्ह्यातील एका वृत्तपत्रात या संदर्भात आलेल्या वृत्तानंतर आमदारांनी आपली भूमिका मांडली.


