नाशिकमध्ये चक्क एटीएम फोडले : दोघे आरोपी जाळ्यात


नाशिक : चोरट्यांनी चक्क एटीएम फोडून त्यातील रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत दोघांच्या मुसक्या आवळल्या तर तिघे मात्र पसार झाले. सातपूर परीसरात मंगळवारी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. पंचवटी परीसरातील हिरावाडी रोडवरील विधातेनगर भागातील एका बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला मात्र ही घटना रस्त्याने ये-जा करणार्‍या काही जागरूक नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

पळण्यापूर्वीच दोघांना पकडले
संशयितांनी बोलेरो जीप मधून पळ काढला त्यानंतर पोलिसांनी सदर बोलेरो चा पाठलाग सुरू केला. बोलेरोसह सर्व संशयित पंचवटीतील हिरावाडी रोडने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पंचवटीत पोलीस ठाण्याच्या सीआर मोबाईलने पाठलाग करून हिरावाडी रोडवरील विधातेनगर परीसरात बोलेरोला पोलीस गाडी आडवी लावून दोघा संशयितांना पकडले तर अन्य संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. आरोपींच्या ताब्यातून बोलेरो जप्त केली असून या गाडीला दोन नंबर प्लेट असल्याचे उघडकीस आले आहे. जीप चोरीची आहे का याचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सातपूर येथे एटीएम फोडण्याचा असाच प्रयत्न झाला होता मात्र सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला होता.


कॉपी करू नका.