शिर्डीत दोन लाख 70 हजाराची बेहिशेबी रक्कम पकडली

शिर्डी : शहरातील आरबीएल चौकात शिर्डी पोलिसांनी मंगळवारी दुपारी नाकाबंदी व वाहन तपासणीदरम्यान महिंद्रा कंपनीची (एम.एच.17 बी.डी 2390) या वाहनातून दोन लाख 70 हजारांची रोकड जप्त केली. चालक किरण प्रभाकर डाडर (डिग्रस, ता.राहुरी) व सोबत असलेल्या मनोज मोतीलाल बाफना (मेन रोड, राहुरी) यांना रोकडबाबत विचारणा केली मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने रोकड पोलिसांनी फ्लाईंग स्कॉड मार्फत राहता तहसीलदारांकडे जमा केली. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी ही रक्कम उप कोषागार कार्यालय कोपरगाव कार्यालयात जमा केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई अहमदनगरचे पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, शिर्डी उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, जाने, सोनवणे, कुर्हे, अंधारे, मैंदे, पंडोरे आदींच्या पथकाने केली.
