बीग बी.अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई : बीग बी तथा महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला असून याबाबत ट्विट करून माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली.अमिताभ बच्चन यंदाच्या वर्षी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. ‘सात हिंदोस्तानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. परंतु ’जंजीर’ या चित्रपटाने त्यांना प्रकाशझोतात आणले. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.