भाजपा-सेना युतीबाबत संभ्रम : भाजपाध्यक्षांचा दौरा रद्द


मुंबई : जागा वाटपाच्या तिढ्यावरून युतीचे घोडे अडले असतानाच भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द झाला असून भाजपा-शिवसेनेची युती होणार वा नाही ? याबाबत मात्र संभ्रम आहे. माध्यमांइतकी काळजी आम्हाला असल्याचे अलिकडे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य तर उद्धव ठाकरे यांनी आमचा लोकसभा निवडणुकीआधी फार्मुला ठरला असल्याच्या वक्तव्यानंतर युती होणार हे निश्‍चित मानले जात होते मात्र अलिकडच्या काळात दोन्ही पक्षातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे युतीबाबत मात्र संभ्रम असल्याचे एकूच चित्र आहे.

26 रोजीचा अमित शहांचा दौरा रद्द
अमित शाहांचा दौरा रद्द झाल्यामुळे 26 सप्टेंबरला युतीच्या घोषणेच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. लोकसभेला अमित शाहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार विधानसभेसाठीही शाहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा होणार अशी चर्चा सुरु होती. पण शाहांचा दौरा रद्द झाल्यानं युतीचं काय हा प्रश्नही कायम आहे. पक्षांतर बंडाळी टाळण्यासाठी युतीची घोषणा लांबणीवर पडल्याचं आणखी एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे तसेच वाद टाळण्यासाठी युतीच्या घोषणेची घाई नको, असा सूर वरीष्ठ पातळीवर असल्याचे समजते.


कॉपी करू नका.