p>

रेल्वे कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे काशी एक्स्प्रेसचा अपघात टळला


भुसावळात बफर बदलला : दिड तासांच्या विलंबानंतर गाडी रवाना

भुसावळ- गोरखपूर एलटीटी काशी एक्स्प्रेस (15018) च्या एस – 8 या डब्याचे बफरला तडा गेल्याचे स्थानकावरील रेल्वे कर्मचार्‍यांच्या वेळीच प्रकार लक्षात आल्याने गाडीपासून डबा दूर करीत बफर बदलविण्यात आल्यावर गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली, या सर्व सोपस्कारात गाडी जंक्शनवर 1 तास 20 मिनीटे थांबली होती. भुसावळ येथून गाडी सुटल्यावर जर बफर तुटले असते तर मोठाच अनर्थ घडला असता. रेल्वे कर्मचार्‍यांच्या दक्षतेने संभाव्य अपघात टळला.

कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे टळला अपघात
सद्या रेल्वे गाड्यांना मोंठ्या प्रमाणावर गर्दी आहे. या गर्दीत गाड्या प्रवाशांनी फुल्ल भरून मुंबईकडे व उत्तर भारतात जात आहे. नवरात्रोत्सवामुळेही गाड्यांना गर्दी वाढली आहे. बुधवारी सकाळी गोरखपूर एलटीटी काशी एक्स्प्रेस भुसावळ जंक्शनवरील प्लॅटफॉर्म चारवर 10.28 वाजता आली असता, रेल्वे स्थानकांवर सीअ‍ॅडडब्ल्यूच्या कर्मचार्‍यांकडून गाडीची स्थानकावर जात असतांनाच निरीक्षण केले जात असते. यावेळी गाडीचे निरीक्षण सुरू असतांना इंजीनपासून आठव्या क्रमांकाच्या एस-8 या डब्याचे बफरला तडा गेल्याचे कर्मचारी रवीचंद्रन व जितेद्र यांना जाणवले गाडी प्लॅटफॉर्मला थांबल्यावर दोन्ही कर्मचार्‍यांनी खात्री करण्यासाठी एस-8 डबा थांबला होता, तेथे जाऊन बफरची पाहाणी केली. त्यावेळी बफरला तडा गेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सर्व बाजूने पाहून खात्री करून हा प्रकार स्टेशन डायरेक्टर जी.आर. अय्यर यांना सांगितला. त्यांनी सहायक यांत्रीक अभियंता असलम जावेद यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ रेल्वे स्थानक धाव घेत एस-8 डब्याची पाहाणी केली. यावेळी अन्य अधिकारी सुध्दा डब्याजवळ जाऊन पहाणी करीत होते, रेल्वेचे कर्मचारी सुध्दा तेथे हजर झाले. एस- 8 या डब्याला गेलेला तडा हा गंभीर असल्याने बफर बदलविण्याचा निर्णय यावेळी रेल्वे अधिकार्‍यांनी घेत तात्काळ त्याची अंमलबजावणी केली.

गाडीपासून डबा केला वेगळा
एस – 8 या डब्याचे बफर बदलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तत्काळ गाडीपासून हा डबा वेगळा करण्यात आला. रेल्वेच्या यांत्रीक विभागाच्या कर्मचार्‍यांनी आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून या डब्याचे तडा गेलेले बफर बदलविण्याची प्रक्रीया सुरू केली. या प्रक्रीयेस सुमारे तासभराचा कालावधी लागला. तासभरात कर्मचार्‍यांनी डब्यास नवीन बफर लावून तडा गेलेला बफर जमा केला. नवीन बफर लावून डबा पुन्हा गाडीला जोडण्यात आला.


कॉपी करू नका.