धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड परीसरात सातत्याने धुमाकूळ घालणार्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला गुरुवारी यश आले. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने शेतकर्यांकडील पाळीव जनावरांचा फडशा पाडल्याने शेतकरी मेटाकुटीस आले होते. 24 सप्टेंबर रोजी चाळीसगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात शेतकर्यांनी मोठ्या जमावनिशी वनविभागाचे अधिकारी पवार यांच्याकडे तक्रार केली होती. वनविभागाने दखल घेत पिंजरा लावल्याने गुरुवारी पहाटे त्या बिबट्या अडकल्याने शेतकर्यांनी सुटकेचा श्वास घेतला. बिबट्याला पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.




