p>

गैरसमज दूर करण्यासाठी विज्ञान हे एकमेव साधन


प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सायन्स असोसिएशनचे उद्घाटन

भुसावळ  : गैरसमज दूर करण्यासाठी विज्ञान हे एकमेव साधन असून जीवन जगताना मनाची जागृती नवनवीन विचारांची सांगड घालून आपण आपले जीवन समृद्ध करायला पाहिजे हे सर्व विज्ञानाने शक्य होत असते, शास्त्र म्हणजेच प्रत्यक्षात सिद्धता असते, असे प्रतिपादन फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी केले. दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात गुरुवारी सकाळी 10 वाजता सायन्स असोसिएशच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. प्रा.डॉ.जी.पी.वाघूळदे व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजन हवे
प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी विज्ञानासंदर्भात विविध दाखले देऊन सखोल मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा, बुवाबाजी आदी गैरसमज दूर करण्यासाठी विज्ञान हे एकमेव साधन असल्याचे त्यांनी सांगत विद्यार्थ्यांनी ध्येय व उद्दिष्ट ठरवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नतसेच आतपासून नियोजन करायला हवे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विज्ञानाची कास धरा -प्राचार्य फालक
डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विज्ञान युगात जगत असताना विज्ञानाची कास धरून स्वावलंबी बनून जीवन यशस्वी जगावे, असे ते म्हणाले. सायन्स असोसिएशनच्या माध्यमातून विविध कार्यक्रम जसे विज्ञान प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रश्नावलीत विद्यार्थ्यांनी विचारांचे आदानप्रदान करून सर्वांनी एकत्रीत राहून विज्ञानाविषयी गोडी निर्माण करावी तसेच संशोधनाची वृत्ती निर्माण व्हावी व शोधक वृत्तीचा विद्यार्थी घडावा, असेही ते म्हणाले. हे सर्व सायन्स असोसिएशन माध्यमातून साध्य करता येईल, असे प्राचार्य फालक म्हणाले.

यांनी घेतले परीश्रम
प्रा.डॉ.जी.पी.वाघूळदे यांनी प्रास्तविकात ाकाऊ वस्तूपासून नवीन वस्तूची निर्मिती तयार होते तसेच आपल्या परीसरातील जैविक, वनस्पती व प्राणी यांचा सखोल अभ्यास करून त्यांचे वैज्ञानिक औषधी उपयोगी गुणधर्म शोधून त्यांचे एक पुस्तक तयार करायचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी सायन्स असोसिएशन प्रतिनिधी तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी परीश्रम घेतल्याचे सायन्स असोसिएशन प्रमुख प्रा.डॉ.जी.पीवाघूळदे व प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.


कॉपी करू नका.