उपराजधानी हादरली : एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या


नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बागल आखाडा परीसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हत्याकांडानंतर आरोपी आलोक माटूरकर यानेदेखील आत्म्हत्या केली. कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

पाच जणांची केली हत्या
आरोपी आलोकने पत्नी विजया माटूरकर, मुलगी परी माटूरकर (14 वर्ष), मुलगा साहिल माटूरकर (12 वर्ष) सासू लक्ष्मीबाई बोबडे आणि मेव्हणी अमीषा बोबडे यांची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी आलोकने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणार्‍या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली व त्यानंतर पुन्हा स्वत:च्या घरी परतत गळफास घेऊन त्यानं स्वत:ला संपवल्याचे बोलले जात आहे.

कौटुंबिक कलहातून हत्या?
अलोक हे टेलरिंगचं काम करायचा. अलोकने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समजू शकले नाही. पण कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !