पाच हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात


औरंगाबाद : पाच हजार रुपयांची लाच घेताना पंढरपूर सजा येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला. वळदगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी ट्रॅप होताच मोठी खळबळ उडाली. पूमनसिंग बंकटसिंग डोंगरजाळ (57,रा. रा. वेदवाडी, ता.वैजापूर) असे अटकेतील आरोपी तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या रो हाऊसची सातबार्‍यावर नोंद करण्यासाठी प्रती रो हाऊस तीन हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी डोंगरजाळची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. डोंगरजाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताच खळबळ उडाली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !